ती एक काळरात्र
That Dark Night
नाशिकच्या एका रात्रीची अजरामर कहाणीThe immortal story of one night in Nashik
शांत नाशिक जागे झाले
Sleeping Nashik Awoke
काही वर्षांपूर्वी नाशिक शहरात घडलेला हा प्रसंग. आजही सर्वांना स्तिमित करून जाणारा आहे. ती एक काळरात्र ठरली होती. दिवसभर दमून रात्रीला विसावा घेणारे जीव गाढ झोपेत असता एकदम घणाण् घणाण् घंटा वाजू लागली. त्या घणाघाती आवाजाने सन्नाट्याची शांतता दुभंगली. लोक खडबडून जागे झाले. काही खिडक्यांकडे धावले, काही घरांतून बाहेर रस्त्यावर आले. पाहतात तो काय? समोर एका दुमजली इमारतीला प्रचंड आग लागली होती. त्या इमारतीत अनेक कुटुंबे वास्तव्याला होती. आतले लोक जीव मुठीत धरून बाहेर धाव घेत होते. खाली चौकाच्या सोप्यात गाईगुरे बांधलेली होती.
This incident happened in Nashik city some years ago. It still stuns all who hear it. It was one dark, fateful night. People exhausted from the day's work were in deep sleep when suddenly loud bells began clanging. That thunderous sound shattered the midnight silence. People jolted awake. And what did they see? A massive fire had engulfed a two-storey building ahead. Many families lived there. People inside were fleeing, clutching their lives.

"आई! आई!" — वरच्या मजल्यावरून
"Aai! Aai!" — From the Upper Floor
दुसऱ्या मजल्यावर अडकलेली मुले "आई ! आई !" म्हणून आर्त हाक मारत होती. मुलांची माता बाहेर धावत आलेली होती. ती आपल्या पिलांच्या आर्त हाकेने वेडी झाली. मुलांच्या दिशेने ती त्या आगीत शिरायला धावली. लोकांनी तिला अडवले. एकाने तर तिचा हात घट्ट पकडून तिला मागेच खेचले. ती रडत होती, ओरडत होती. अग्निशमन दलाची गाडी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती; पण आगीचे प्रचंड लोळ विझवणे अशक्य होत होते.
Children trapped on the second floor were crying desperately — "Aai! Aai!" (Mother! Mother!). Their mother came running out, driven mad by her children's desperate cries. She rushed toward the fire. People stopped her. One person grabbed her arm and pulled her back. She was crying, screaming. The fire engine was trying its utmost — but those massive flames were impossible to extinguish.

एक तरुण बाणासारखा आगीत शिरला
One Young Man Rushed In Like an Arrow
तेवढ्यात एक तरुण तिथे धावत आला. झोप बाजूला सारून तो त्या आग लागलेल्या इमारतीकडे वेगाने आला होता. प्राणिमात्रांचे जीव वाचवावेत ही भूतदया शिकवणाऱ्या आपल्या संस्कृतीचे जणू बाळकडूच त्याने प्याले होते. त्याने काचा कसली आणि त्या आगीत तो बाणासारखा शिरला. जनसमुदायाच्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच तो तरुण भरभर त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहोचला.
Just then a young man came running. Setting aside his sleep, he raced to that burning building. The compassion for all living beings that his culture had taught him — he had drunk it as his mother's milk. He rolled up his sleeves and rushed into the fire like an arrow. In the blink of the crowd's eyes, that young man quickly reached the upper floor — heedless of the scorching heat and choking smoke.
गादीत गुंडाळून — मुले वाचली!
Wrapped in Mattresses — Children Saved!
दुसऱ्या मजल्याला आता आगीने पूर्ण वेढलेले होते. जिना जळून कोसळला होता. काय करावे? त्या तरुणाने लगेच एकेका गादीत एकेका मुलाला गुंडाळले आणि खाली ओरडला —
The second floor was now completely surrounded by fire. The staircase had burned and collapsed. What to do? The young man immediately wrapped each child in a mattress one by one and called down —
गर्दीला एकदम भान आले. वरून फेकलेल्या गादीतील मुलांना अलगद झेलले. मुले वाचली! त्यांची आई आनंदली! मुलांना पोटाशी घेऊन ती पटापट पापे घेऊ लागली. रडता रडताही तिला हसू येत होते.
The crowd suddenly came to their senses and caught the children gently. The children were saved! Their mother rejoiced! Clutching them to her chest she kissed them again and again. Even while crying she could not stop smiling.

गाईचा हंबरडा — बापूराव पुन्हा आगीत!
The Cow's Cry — Bapurao Enters Again!
"खरा वीर शोभतोस!" प्रत्येक ओठातून उत्स्फूर्तपणे शब्द फुटत होते. तो तरुण — बापूराव गायधनी — कृतार्थतेने निःश्वास टाकत होता. गर्दी त्या वीरापुढे नतमस्तक झाली. तोच चौकाच्या सोप्यातून एका गाईचा हंबरडा बापूच्या कानी पडला. बापूचे हृदय त्या हंबरड्याने हेलावले. लोकांच्या अडवण्याला पार झुगारून तो वीर पुन्हा त्या आगीत शिरला. काही गुरे त्याने मोकळे केली; पण एका गाईच्या दाव्याची गाठ सुटेना. बापूरावाने अंगातले उरलेसुरलेले सगळे बळ एकवटले आणि आवेशात दावे जोरात ओढले. खुंट्यासहित ते दावे हाती आले. गाय मोकळी झाली.
"You are truly a Veer!" burst from every lip. That young man — Bapurao Gaidhani — exhaled with deep fulfilment. The crowd bowed before that hero. Just then a cow's distressed cry reached his ears from the courtyard. His heart was shaken. Brushing aside all restraints, the hero entered the fire again. He freed some cattle; but one cow's rope knot would not open. Bapurao gathered every last ounce of strength and pulled with all his might. The peg came out. The cow was freed.

बापूराव कोसळले — आणि अमर झाले
Bapurao Falls — And Becomes Immortal
आगीच्या भयंकर लोळातून बाहेर पडत असताना बापूराव बेशुद्ध होऊन खाली कोसळला. ज्या मातेची मुले त्याने वाचवली होती ती माता कृतज्ञतेने बघत होती. ती माता त्या तरुणापुढे वाकणार, तोच बापूराव बेशुद्ध होऊन खाली कोसळला. गर्दीतील काही लोकांनी त्याला उचलले. दवाखान्यात नेले. बापूराव खूपच जळाला होता. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली; पण भयंकर जखमांनी विव्हळणाऱ्या बापूरावाला ते वाचवू शकले नाहीत. इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपले प्राण बापूरावाने वेचले. बापूराव नश्वर जग सोडून गेला आणि अमर झाला.
As he came out from the terrible blaze, Bapurao lost consciousness and collapsed. The mother whose children he had saved was about to bow before him when he fell. People carried him to hospital. Bapurao was severely burned. Doctors tried their utmost — but they could not save him. Bapurao gave his life to save the lives of others. He left the mortal world — and became immortal.

लोकांनी बापूराव गायधनींचे उचित स्मारक नाशकात उभारले. 'वीर' ही बहुमानाची पदवी दिली. महात्मा गांधींनीदेखील हे वृत्त कळताच "धन्य त्याचे माता पिता" म्हणून गायधनी कुटुंबाची प्रशंसा केली.
The people erected a fitting memorial in Nashik and conferred the title of 'Veer'. Mahatma Gandhi, upon hearing the news, praised the Bravery Award recipients saying "Blessed are his parents."









